Login

"काय माझा गुन्हा...?" भाग २८

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग २८


कॉलेजमध्ये एका आठवड्यानंतर...

गौरवी जेव्हा कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करते तेव्हा तीला समोर पुन्हा एकदा बाईक आडवी करुन माधव उभा असलेला दिसतो...

गौरवी काही एक न बोलता व त्याच्याकडे नजर न टाकता ती शांतपणे त्याच्या बाजूने जाऊ लागते...

"गुड मॉर्निंग..." जेव्हा गौरवी माधवच्या बाजूने जात असते तेव्हा माधव पटकन तीला बोलतो...

तेव्हा गौरवी तिथे आजुबाजुला बघत असते... आणि विचार करत असते कि "हा नक्की कोणाला बोलला...?"

तेवढ्यात माधव बोलतो... " इकडे तिकडे बघू नकोस... मी तुलाच बोललो होतो... मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे..."

"आता अजून काही उरलं आहे का बोलायला...?" गौरवी शांतपणे बोलते...

"हो उरलं आहे काहीतरी बोलायला... म्हणून तुला सकाळच्या शुभेच्छा दिल्या..." माधव सुद्धा शांतपणे बोलतो...

"ठिक आहे... गुड मॉर्निंग... आता बोल माझ्याशी काय बोलायचे आहे... ते पटकन... मला लेक्चर अटेंड करायचे आहे..." गौरवी शांतपणे बोलते...

"मला सुद्धा लेक्चर अटेंड करायचे आहे... मी काय सोडलेला बैल नाही कुठे ही हुंदडायला..." माधव लटक्या रागात बोलतो...

तेव्हा गौरवी गालातल्या गालात हसू लागते...

तीला अस गालातल्या गालात हसताना पाहून माधव त्याच लटक्या रागात बोलतो...
" मी तुझी कधीपासून वाट बघत इथे उभा होतो... याचा अर्थ असा नाही की मी इथे टाईमपास करायला येतो... आज आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्यातरी मुलीसाठी मी असा ताटकळत वाट बघत उभा होतो..."

"सॉरी... मला वाटलं कि तु कॉलेज मध्ये टाईमपास करायला येतोस... I'm really sorry..." गौरवी आपले कान पकडून बोलते...

तीला असं कान पकडून बोललं बघून माधव गालातल्या गालात हसत बोलतो...
"ऐ वेडाबाई... कान कशाला पकडतेस... राहू दे... उगाच कोणी पाहिले तर पुन्हा मला सस्पेंड करतील..."

तेव्हा  गौरवी आपले हात खाली घेत मुळ मुद्यावर येत बोलते...
"तुला काही महत्त्वाचे बोलायचे होते ना... मग ते कधी बोलणार आहेस... कारण आता बेल वाजेल... आणि लेक्चर सुरू होतील..."

"ठिक आहे... आता लेक्चर सुरू होतील... तेव्हा आपण संध्याकाळी बाहेर कॅफेत भेटू... कॉलेज सुटल्यावर..." माधव हसून बोलतो...

"संध्याकाळी... कॉलेज सुटल्यावर...?" गौरवी एवढंच बोलते...

"हो... तुला चालेल ना...? कि काही प्रोब्लेम आहे का...?"  माधव काळजीच्या सुरात विचारतो...

"प्रोब्लेम असा नाही... म्हणजे मी तुला किती ओळखते... म्हणजे मला असं म्हणायचं होतं की..." गौरवी बोलत असताना माधव तिचे बोलणे मधेच तोडत बोलतो...

"तुझा माझ्यावर विश्वास नाही...?"


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all